अवनी म्हणजे T1 वाघिण,
पहिले बघुया अवनी तिच्या आईसोबत यवतमाळ परीसरात काही वर्षा अगोदर दाखल झाली. परंतु तिच्या आईचा करंट लागुन मृत्यू झाला. काही वर्ष अवनी यवतमाळातील मोहदा परीसरात रहायची. परंतु २ वर्षापासून अवनिचे रुप बदलले.
मागील १.५ वर्षात तब्बल १३ लोकांचा जिव या वाघिणीने घेतला. त्यापैकी ७ लोकांचे पोस्टमार्टम करण्यात आले व ५ मृतांच्या शरीरावर तिचे लाळीचे अवशेष आढळले. (सोशल मिडियावर ज्या बोंब उठवल्या जात आहेत की रिपोर्ट नाही ही साफ खोटी गोष्ट आहे.)
घरासमोर कुत्रा आल्यावर गोटा मारुन हाकलणारे अचानक तिला वाचवा म्हणून हैशटैग लावु लागले.
पहिले बघुया अवनी तिच्या आईसोबत यवतमाळ परीसरात काही वर्षा अगोदर दाखल झाली. परंतु तिच्या आईचा करंट लागुन मृत्यू झाला. काही वर्ष अवनी यवतमाळातील मोहदा परीसरात रहायची. परंतु २ वर्षापासून अवनिचे रुप बदलले.
मागील १.५ वर्षात तब्बल १३ लोकांचा जिव या वाघिणीने घेतला. त्यापैकी ७ लोकांचे पोस्टमार्टम करण्यात आले व ५ मृतांच्या शरीरावर तिचे लाळीचे अवशेष आढळले. (सोशल मिडियावर ज्या बोंब उठवल्या जात आहेत की रिपोर्ट नाही ही साफ खोटी गोष्ट आहे.)
घरासमोर कुत्रा आल्यावर गोटा मारुन हाकलणारे अचानक तिला वाचवा म्हणून हैशटैग लावु लागले.
आता दुसरा विषय तिच्या घरात आपण गेलो ति आपल्या घरात आली नाही. ह्या ज्या शिकारी ७५०० हेक्टर परिसरात झाल्या त्यापैकी ६००० हेक्टर जमिन ही शेतजमीन आहे. याची खात्री मि स्वतः त्या परिसरातील लोकाकडुन करुन घेतली. शेतात काम करणारे मजुर किंवा सरपन (लाकड) गोळा करणार्या वर कामाच्या वेळेस झालेले हे हल्ले आहेत.
आता तिसरा विषय या भागात चुनखडी किंवा चंदन आहे त्यासाठी ही उठाठेव सुरू आहे.
स्थानीक एसडिओच्या स्टेटमेंट नुसार या भागात अशा प्रकारच्या मुलद्रव्याच्या खाणी नाहीत. त्यामुळे रिलायन्स किंवा खाजगी कंपन्या अशे विषय आले कोठून हे समजत नाही. बहुसंख्य आदिवासी बहुल असलेला हा भाग आजही जुन्या पध्दतीवर अवलंबून आहे.
स्थानीक एसडिओच्या स्टेटमेंट नुसार या भागात अशा प्रकारच्या मुलद्रव्याच्या खाणी नाहीत. त्यामुळे रिलायन्स किंवा खाजगी कंपन्या अशे विषय आले कोठून हे समजत नाही. बहुसंख्य आदिवासी बहुल असलेला हा भाग आजही जुन्या पध्दतीवर अवलंबून आहे.
चौथा विषय तिला बेशुद्ध करुन ठेवायला पाहीजे होत. आता हे माझे वैयक्तिक मत एखाद्या "नरभक्षक" वाघाला पिंजर्यात ठेऊन त्याच्यावर खर्च कशाला? ज्या वाघाला मारा म्हणून ५ ते १० हजार लोकांचे मोर्चे निघाले हे सर्व त्या भागात राहणारे लोक खोटे व दिल्लीतील PETA च्या कार्यालयात बसुन ट्रेंड चालविणारे खरे का?
एकच विषय विसरलो की वाघिणीने या ४ महिन्यात कुठलाच माणूस मारला नाही. कसा मारणार ईथे ५ महिन्या पासुन २ टीम काम करत आहे. एक वाघीणीला बंदिस्त करायला व दुसरी लोकांना वाचवायला. ५ च्या अगोदर गुरे ढोरे माणस सगळे गावात परततात. तेवढेच सर्तक देखील राहतात.
खेड्यातील रोज मजुरांचा जिव कवडीमोल झाला आहे वन्यजिव प्रेमिंना? एका खुनावर भारतीय संविधान देखील फाशीची शिक्षा देते तिने मारलेल्या जिवाचे काय? मि WHATSAPP वरील फोटो डिलेट केले कागदा सारखे माणस तिने फाडले. त्याच्या घरच्या लोकांच्या डोळ्यातील पाणी आजही थांबल नाही आहे त्यांचा विचार कोणी केला का?
आता अवनी वर सिनेमा येईल महेश कोठारे तिन चार दिवस राहुन गेले ईकडे तिची माहीती घेण्याकरिता. ति कशी भोळी होती माणसा सोबत खेळताना तिचा दात अचानक कसा त्यांना रुतला असपन दाखवले तर नवल नाही. जंगलातील जनावरांमुळे होणार नुकसान आम्ही शेतकरी सोसतो. माझ्या स्वतःच्या शेतातील नुकताच लावलेला १५ एकर चणा एका रात्रीतुन रोह्यांनी (रानगाय) कसा साफ केला हे डोळ्याने बघितले आहे. प्राण्यांकरीता माणसाचा जिव जाणे योग्य का?
सदर माहीती मी स्वतः काही जाणकार व त्या भागातील लोकांकडून घेतलेली आहे. चुका काढणारे किंवा प्रतिप्रश्न करणारे अनेक येतील. माझ्याकडून उत्तर येतीलच याची अपेक्षा करु नये. सदर विषयाची या भागातील नागरीक म्हणून उत्तर दिले आहे.
आणी DARWIN सांगुन गेलाय SURVIVAL OF THE FITTEST हा नियम मला तंतोतंत कुठल्याही क्षेत्रात पटतो. ज्यांना नरभक्षक वाघिण गेल्याचे दुख आहे त्यांनी तिचे पिले घरी नेऊन आपल्या लेकरा बाळात ठेऊ शकता. आमच्या लेकरा बाळावर शेतकर्यावर शेतमजुरांवर हि आपत नको. ट्विट करणार्या सेलिब्रिटीनी सिंगापुरचे वाघ व प्राणी संग्रालयातील वाघ बघितले असेल कधी विदर्भातील वाघ बघावे हि विनंती....
आणी राजकारण्यांचं काय ते कशावरही राजकारण करणार, आम्हाला आमचा जीव प्यारा!
सगळ्यात महत्त्वाचं। गावातील काही लोक स्वतः मान्य करतात की माणसे मेल्याने त्यांना फायदा होतो, सरकार पैसे देते आणि थोडे दिवस तरीत्यांची गरिबी मिटते।
तिथे कोर्टात केस चालू आहे तिथे तुम्ही हजर होता का?
13 पैकी फक्त 3 माणसांचे autopsy करण्यात आली आणि फक्त एकाच्यात tiger cha DNA सापडलाय।
स्वतः NTCA (National tiger Conservation authority) मान्य करतीये कि जे काही झालाय ते पुराव्या अभावी आणि सगळे नियम तोडून झालाय।
यातले जास्त मृतदेह सापडले ते weekends ना सापडले, कॅमेरा ट्रॅप शेजारी। माझा प्रश्न हा आहे की पहले माणूस मेला मग ट्रॅप लावले कि त्या वाघिणीला माहित होते ट्रॅप बघून त्यांना मारायचे। समजा सगळे खून तिने केले तर SCAT ANALYSIS का नाही केला? तिला नारभक्षी ठरवताना सुद्धा हजारो नियम मोडले गेलेत। तिला कोणी पहिल्याच पुरावा पण नाही। तो कोणता हि वाघ होऊ शकला असता।
माणूस वाघाची नैसर्गिक शिकार नाही। वाघ कधीच माणसावर हल्ला करत नाही, तस असत तर वनाधिकारी हातात काठी घेऊन चालत जंगले फिरले नसते। माणूस जेव्हा खाली बसतो तेव्हा त्याची उंची वाघापेक्षा कमी होते, वाघाला तो त्याची शिकार वाटतो आणि हल्ला करतो पण त्यांना कधीच खात नाही। असेच आपल्याला या case मध्ये हि दिसते। जी शव सापडली त्या सगळ्यांचे विघटन होत होते। असे तेव्हाच होते जेव्हा त्या तसाच सडत असतात। समजा वाघाने खाल्ले असेल तर ते फक्त हाडे ठेवतात आणि त्यांवर जास्त मास सापडत नाही। ही आपली चूक आहे की आपण त्यांच्या भागात जाऊन अशी वर्तन करतो।
जे कोणते मृतदेह सापडले ते सगळे आत जंगलात सापडले। शेतात सापडले हि माहिती चुकीची आहे। तस असेल तर मग शेतात कॅमेरा ट्रॅप का लावलेले? शेवटचा 14वा बळी शेतात गेला ते पण तेव्हा जेव्हा 200 च्या वरती माणसे जंगलात फिरत होती तिला शोधायला, ती गावात शिरणारच, तिला स्वतःचा आणि स्वतःचा पिल्लांचा जीव वाचवायचं, त्यांचं पॉट भरायचय। गावातले लोक स्वतः च्या हक्क असल्या सारखे जंगलाची जमीन वापरतात, तो restricted area आहे माहित असून त्यात चूक कोणाची? ज्या शेतात ते काम ते पण आधी जंगल होते। ती अतिक्रमण केलेली जमीन आहे। तिथली माणसे स्वतः बोलतात कि आम्ही जंगलात जातो गुरे चरायला। मग त्यात वाघाची काय चूक?
फक्त एका वाघिणी ला मारण्यासाठी सरकार ने करोडो रुपये खर्च केले। 200 च्या वर लोकांचे पगार, ड्रोन cost, dogs hiring cost, transportation of elephant's, private shooter che charges which are in lakhs, तिच्या साठी crores rupees चे दुसऱ्या वाघाच्या मूत्राचा वास असलेले द्रव्य मागवले गेले। तिला मारण्यासाठी 10 करोड रुपये खर्च झाला आणि government ने 1000 करोड रुपये खर्च मंजूर केला। एवढा खर्च कधी जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्यासाठी तरी मंजूर केलाय का?
खूप महत्त्वाच, तुम्ही माहिती निट नाही काढली sir, please Google वर search करा। ती जमीन खरंच अंबानीच्या company la विकली आहे, नंतर ती अंबानीची company अडाणीने विकत घेतली आहे। त्या कंपन्यानी तसे काही वर्ष पूर्वी स्वतः press release करून सांगितले आहे।
तिला पहिले गोळी घालण्यात आली नंतर तिला पकडण्याचे खोटे प्रयत्न करण्यात आले हे तिच्या autopsy मध्ये सिद्ध झाले। तिला मारण्यासाठी अशा माणसाला बोलावले जो प्राण्यांना निरापराधांना मारणे enjoy करतो, त्यासाठी सरकार ला पैसे खिलावतो। तो स्वतः देश द्रोही आहे, hydrabad सरकार ने त्याला नक्षल वाद्यांना हत्यारे पुरवण्याचा आरोपावरून पकडले होते, त्याला त्याची शिक्षा पण झालीये। सरकारी व्यवस्था एवढी खराब झालीये का? का हे सगळे सांभाळणे जड होतंय वनाधिकाऱ्यांना?
निरापराधानचा अजून जीव जाऊ नये, मग तो माणूस आहे किंवा प्राणी यासाठीच सगळे चालले आहे।