महात्मा गांधींच्या त्या Viral फोटोमागचे सत्य, जे आजही लोकांना माहीत नाही.
महात्मा गांधी हे कसे मस्तीखोर, अय्याश स्वभावाचे होते. त्यांना विदेशी सुंदर स्त्रियांसोबत नृत्य करायला कसे आवडायचे, असे वर्णन असलेले छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. असेच एक छायाचित्र ‘व्हॉट्सअॅप’वर ‘व्हायरल’ झाले आहे. यात गांधीजी एका विदेशी महिलेसोबत नृत्य करीत असल्याचे दिसत आहे.
परंतु हे छायाचित्र खरे नाही. एका ऑस्ट्रेलियन कलाकाराने सिडनी येथे झालेल्या सोहळ्यात गांधींसारखी वेशभूषा धारण करून तरुणीसोबत नृत्य केले होते. विशेष म्हणजे, या छायाचित्राविषयीचा खरेपणा अनेकांनी वारंवार सिद्ध करूनही काही जण बदनामीच्या उद्देशाने नृत्याचे छायाचित्र प्रसारित करीत आहेत. त्यामुळे सुज्ञांनी ते ‘फॉरवर्ड’ करू नये, हाच यावरील उपाय आहे!