या मराठी अभिनेत्रीला बोल्ड सिनमुळे अनेकांनी ठेवली होती नावे “पॉर्न स्टार”… आज चक्क दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतेय
आजवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री बोल्ड सिन देऊन चर्चेचा विषय ठरल्या आहेत. याच यादीत मराठी मुलगी म्हणून बॉलिवूड मध्ये वावरणारी अभिनेत्री “राजश्री देशपांडे” हिची दुसरी बाजू येथे आवर्जून सांगावीशी वाटते. राजश्री मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील मुलगी. वकिलाच्या पदवीसाठी तिने पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये रुजू झाली. त्यानंतर मुंबईत जाऊन जाहिरात क्षेत्रात काम करू लागली. अभिनयाची आवड असल्याने थेटर जॉईंट केले. तलवारबाजी, मार्शल आर्टस् , कथकली मध्ये तिने प्राविण्य मिळवले.
अनेक शॉर्ट फिल्मही राजश्री देशपांडेने साकारल्या आहेत. याखेरीज तिचा “सेक्सी दुर्गा ” हा चित्रपट ही हिट ठरला. नुकताच तिचा बॉलिवूड चित्रपट “स्केअर्ड गेम्स” येऊन गेला. सैफ अली खान, राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्दीकी यासोबत राजश्री देशपांडे देखील झळकलेली पहायला मिळाली. या चित्रपटात तिने सुभद्रा गायतोंडे साकारली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतचा तिचा बोल्ड सिनही तितकाच चर्चेचा विषय ठरला होता. या सिन मुळे राजश्रीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. एवढेच नाही तर तिला चक्क एक “पॉर्न स्टार” म्हणूनच घोषित केले गेले. तिला नक्कीच चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत पण तिने जे कार्य केली ते खरोखरच वखळण्याजोगे आहे.
या सर्वातून बाजूला होऊन गेली ५ ते ६ वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील गावे दत्तक घेत आहे. पांढरी पिंपळगांव, माठ जळगाव सारखी गावे तिने दत्तक घेऊन पाणीदार केली आहेत. यात तिला तिच्या घरच्यांकडूनच प्रेरणा मिळाली असल्याचे ती सांगते.
या सर्वातून बाजूला होऊन गेली ५ ते ६ वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील गावे दत्तक घेत आहे. पांढरी पिंपळगांव, माठ जळगाव सारखी गावे तिने दत्तक घेऊन पाणीदार केली आहेत. यात तिला तिच्या घरच्यांकडूनच प्रेरणा मिळाली असल्याचे ती सांगते.