पुरूषांना काय आवडेल,याचा विचार करून स्वतःला घडवू नका. पुरूषी नजरेतून स्वतःच सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाच अधःपतन करवून घेण.*
*पुरूषांना उद्दीपित करण्याच साधन म्हणून आपण किती काळ जगणार आहोत?*
सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वतःच काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ- सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.
तुम्ही शिक्षिका असाल तर तुमच सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहलेल्या अक्षरात आहे. विषयाच आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे चेहरे ही तुमची सुंदरता आहे.
तद्वत सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेल प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याच सादरीकरण असत. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मीती करता आली पाहीजे. प्रेमाण बोलणं म्हणजे सुंदरता. आपल मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुस-याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपले सौंदर्य बाहेर येऊ द्या.
हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झाल की आत्मविश्वास वाढतो. आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर होते.
इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहील.
मेरी कोमच सौंदर्य तिच्या ठोशात राहील.
वेळ प्रसंगी त्या दोघी स्मरणात राहू द्या.
तुम्ही जशा जन्माला आल्या तशाच सुंदर आहात, ही खुणगाठ मनाशी बांधून टाका. खात्री बाळगा, सौंदर्याकरीता दुस-या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.
तुमचा दिवस आनंदात जावो . हे लिखाण माझे नाही मी आवडले म्हणून शेअर केले. ज्यांनी लिहीले त्यांना धन्यवाद।
ज्योति....