सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे
शी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे
कार्यवाहक श्री.मीलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी
शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती
नेमली. दुसयर्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना मिळाली. केवळ
निसर्ग प्रेमी श्री. डी. बी. तारापोरवाला यांनी १९४५ साली दिलेले दोन
लाखाच्या रुपयांच्या देणगीमुळे आणि शासनाने दिलेल्या समुद्र तटावरील
मोठ्या भुखंडा मुळे तारापोरवाला मत्स्यालय उभारणे शक्य झाले.

तारापोरवाला मत्स्यालय हे भारतातील प्रेक्षणीय, शैक्षणीक आणि मनोरंजनाचे
स्थळ म्हणून सर्वाना परिचीत आहे. आजच्या दिवशी ६२ वर्षांपूर्वी २७ मे १९५१
रोजी भारताचे राष्ट्रपती माननीय डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे शुभहस्ते
उद्घाटन या मत्स्यालयाचे उद्घाटन झाले होते...